Tuesday, July 02, 2024 09:12:57 AM

'इंडिया' शब्द हटवण्याचा अधिकार कुणालाही नाही'

जळगाव , ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आणि पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्रभरात सभा, बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. पुन्हा पक्ष बांधणीसाठी येवला, बीड नंतर आज जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडणार आहे. जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर आज दुपारी ही तीन वाजता ही जाहीर सभा पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शरद पवार यांची ही पहिली सभा आहे.

केंद्र सरकारने येत्या १८ सप्टेंबरपासून बोलवलेल्या विशेष अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयके मांडणार आहे. या अधिवेशनात भारतीय संविधानातून इंडिया शब्द हटवण्यासाठीही विधेयक मांडले जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

जळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यावर भाष्य करत मोदी सरकारला फटकारले आहे. "इंडिया नाव हटवण्याचा अधिकार कुणालही नाही. इंडिया आघाडीची ताकद पाहून मोदी सरकार अस्वस्थ झाले आहे. देशाशी निगडित असलेल्या नावाबद्दलची अस्वस्थता सत्ताधारी पक्षाच्या लोकांना का होते, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.


सम्बन्धित सामग्री