Tuesday, July 02, 2024 09:34:08 AM

big-update-from-isro-regarding-aditya-l1
आदित्य एल १ बाबत इसरोची मोठी अपडेट

आदित्य एल १ बाबत इसरोची मोठी अपडेट

मुंबई, ३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी :  ISRO ने भारताच्या महत्वाकांक्षी सौर मिशन आदित्य-एल संदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. आदित्य-एल-१ ने आज पाहिल्यांदा आपली कक्षा बदलली आहे. आदित्य एल १ ने पृथ्वीच्या त्याच्या २३५X१९५०० किमीच्या कक्षेतून आता २४५X२२४५९ किमीच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. या द्वारे यानाने सूर्याच्या दिशेने जाण्याचे पहिले पाऊल टाकले आहे. आदित्य एल १ सहा दिवसांच्या कालावधीत पाच वेळा आपली कक्षा बदलून त्यानंतर L1 बिंदूकडे झेप घेईल.

शनिवारी २ सप्टेंबर रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित झाल्यानंतर केवळ ६३ मिनिटे आणि १९ सेकंदाच्या कालावधीत आदित्य एल-1ला पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आले होते. आज या यानाचे थ्रस्टर्स फायर करून त्याची कक्षा बदलली आहे. आदित्य एल १ चे संपूर्ण नियंत्रण पृथ्वीवरून केले जात आहे. हळूहळू आदित्य L-1 आपली कक्षा आणखी चार वेळा बदलेल. पुढील यानाची कक्षा ही ५ सप्टेंबर रोजी केली जाणार आहे १६ दिवस पूर्ण झाल्यावर आदित्य यान सूर्याच्या अभ्यासाठी एल १ या बिंदु कडे जण्यासाठी मार्गक्रमण करेल.

आदित्य एल-१ चार महिन्यांत १.५ दशलक्ष किलोमीटर अंतर कापून लॅन्ग्रेंज पॉइंट-१ गाठेल. हा असा बिंदू आहे जिथे सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण संतुलित होते. येथे एखाद्या वस्तूला राहण्यासाठी जास्त ऊर्जा लावावी लागत नाही. दुसरे म्हणजे, येथून सूर्यग्रहणाचा कोणताही प्रभाव होणार नाही, अशा स्थितीत आदित्य एल-१ सूर्याच्या सातत्याने अभ्यास करण्यासाठी सक्षम होणार आहे. आदित्य एल-१ मधील फायरिंगद्वारेच हे एल-१ वर हॅलो ऑर्बिटमध्ये स्थापित केले जाईल.


सम्बन्धित सामग्री