Saturday, October 05, 2024 03:24:52 PM

megablock-on-all-three-routes-on-sunday-2
रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी :   मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी वाचा. पावसामुळे रेल्वे विभागाकडून दर रविवारी दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक घेतला जातो. त्यानुसार उद्या (दि ९) रोजी देखील रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घोषित कऱण्यात आला आहे. नियोजनानुसार पश्चिम रेल्वेच्या मार्गावर दिवसा कोणताही ब्लॉक राहणार नाही, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. मध्य रेल्वेने विद्याविहार ते ठाणे आणि कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे लोकल २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. माहीम-सांताक्रुझदरम्यान शनिवारी रात्री ब्लॉक घोषित करण्यात आल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. मध्ये रेल्वे मार्गावर ब्लॉकवेळेत मेल-एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक जलद अप आणि डाऊन मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे लोकल फेऱ्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतील. तर हार्बर रेल्वे ब्लॉकवेळेत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान ट्रान्सहार्बरवरील लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉकवेळेत मुंबई सेंट्रल ते सांताक्रुझदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावणार आहेत. जलद लोकल फलाटाच्या अनुपलब्धतेमुळे महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत.


सम्बन्धित सामग्री