Tuesday, February 11, 2025 04:42:25 PM

Boy Dies Hit By Train While Taking Selfie
रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढणं पडलं महागात! ट्रेनने धडक दिल्याने ठाण्यात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मंगळवारी संध्याकाळी अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखाली ही घटना घडली.

रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढणं पडलं महागात ट्रेनने धडक दिल्याने ठाण्यात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Boy Dies Hit By Train While Taking Selfie
Edited Image

Boy Dies Hit By Train While Taking Selfie: ठाणे जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. रेल्वे रुळांवर सेल्फी काढण्यात व्यस्त असलेल्या 24 वर्षीय तरुणाचा ट्रेनने धडक दिल्याने मृत्यू झाला. सरकारी रेल्वे पोलिसांचे (जीआरपी) वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. 

साहिर असं मृत तरुणाचं नाव आहे. तो पश्चिम बंगालचा रहिवासी होता. साहिर ठाण्यातील अंबरनाथ परिसरात सुट्टीसाठी त्याच्या नातेवाईकाच्या घरी आला होता. मंगळवारी साहिर त्याच्या नातेवाईक आणि मित्रांसोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळांवर गेला होता. तो सेल्फी काढण्यात व्यस्त असताना, मागून वेगाने येणाऱ्या कोयना एक्सप्रेसने त्याला धडक दिली. 

हेही वाचा - मुंबई विमानतळावर 2.83 किलो सोन्याची तस्करी उघड – 2.21 कोटींचे सोने जप्त, 4 जण गजाआड!

धडक देण्यापूर्वी मोटरमनने वाजवला हॉर्न -  

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, साहिर अली सेल्फी घेत असतानाच कोयना एक्सप्रेस भरधाव वेगाने आली. ट्रेनचा हॉर्न आणि इतर लोकांनी इशारा देऊनही साहिर बाजूला सरकला नाही. या अपघातात साहिरचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - Shirish Maharaj More Suicide: मोठी बातमी! संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल - 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपीचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. पोलिस निरीक्षक कांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू आहे.
 


सम्बन्धित सामग्री