बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात बाळाच्या पोटात गर्भ असल्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तीन दिवसांच्या नवजात बाळाच्या पोटातून दोन मृत अर्भक काढले आहेत. बाळ पोटात असतानाच अर्भकांचे शरीर तयार झाले होते. या घटनेवर राज्यभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
बुलढाण्यात तीन दिवसाच्या नवजात बालकावर शस्त्रक्रिया केली आहे. नवजात बाळाच्या पोटातून दोन मृत अर्भक काढले आहेत. यामुळे बाळाच्या पोटाला 12 टाके पडले आहेत. शस्त्रक्रियेनंतर नवजात बाळाची प्रकृती स्वस्थ आहे. शस्त्रक्रियेसाठी बाळाला अमरावतीत आणलं होतं. नवजात बाळाच्या पोटातून दोन अर्भक काढण्याची देशातील पहिलीच घटना आहे.
हेही वाचा : ई-श्रम पोर्टलवर 30 कोटींहून अधिक असंघटित कामगार नोंदणीकृत
नेमकं घडलं काय?
सोमवारी एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर त्याला पुढील शस्त्रक्रियेसाठी अमरावतीला हलवण्यात आले. काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात एक 32 वर्षीय गर्भवती महिलेची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी सोनोग्राफीमध्ये बाळाच्या पोटात बाळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही महिला 32 वर्षाची असून तिला याआधी दोन अपत्य आहेत. नऊ महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढलं अशा गर्भधारणेला ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात. सोमवारी या बाळाचा जन्म झाला. त्यानंतर लगेच त्याला अमरावतीला घेऊन जाण्यात आले. त्यानंतर अमरावतीतील रुग्णालयात बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या पोटातून दोन मृत अर्भक काढण्यात आली. दरम्यान बाळाच्या पोटाला 12 टाके पडले आहेत. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती स्वस्थ असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : Ladki Bahin: 'या' लाडक्या बहिणीचे अर्ज योजनेतून नाव वगळण्यात येणार