Tuesday, July 02, 2024 08:48:35 AM

भेंडवडचं भाकीत आहे तरी काय ?

भेंडवडचं भाकीत आहे तरी काय

बुलढाणा, ११ मे, २०२४ प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड हे गाव त्याच्या भाकितासाठी प्रसिद्ध आहे. हे भाकीत म्हणजे पूर्वापार चालत आलेली एक परंपरा आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवड गावात घटमांडणी केली जाते. ही घटमांडणीची परंपरा संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे. याच घटमांडणीला भेंडवडचं भाकीत असंही म्हणतात. दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहतात. यंदा शनिवारी, ११ मे रोजी पहाटे ६ वाजता भेंडवडची घटमांडणी करण्यात आली. यंदा चांगला पाऊस होईल, खरीप पिके साधारण राहतील. रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील, असं भाकीत सांगण्यात आलं आहे.


सम्बन्धित सामग्री