Tuesday, June 25, 2024 12:22:05 PM

निवडणूक आयोगाने बँक मॅनेजरवर निलंबनाची कारवाई

निवडणूक आयोगाने बँक मॅनेजरवर निलंबनाची कारवाई

पुणे, ११ मे २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभेेच्या मतदानाच्या आधल्या रात्री पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हे शाखेचे सुरू होते. याबाबतचा व्हिडिओ राशपचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला होता. त्यानंतर पवार कुटुंबात आरोप प्रत्यारोप होताना दिसून आले. रात्रभर बँक सुरू ठेऊन पैसे वाटपाचे काम सुरू होते असा आरोपही रोहित पवार यांनी केला होता. आता त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी बँकेचे मॅनेजरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. बँक मॅनेजर या प्रकरणात दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ४० ते ५० कर्मचारी आत काम करताना आढळून आले. या प्रकरणात निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.


सम्बन्धित सामग्री