पुणे, ११ मे २०२४, प्रतिनिधी : पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील एनडीए परिसरात बॉम्ब सापडला आहे. पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना हा बॉम्ब सापडला आहे. त्यामुळे तेथील कामगार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. एनडीए परिसरात जवळच्या जंगलात घेऊन जाऊन स्फोटकाच्या सहाय्याने बॉम्ब निकामी करण्यात आला. बीडीडीएस पथकाने घटनास्थळी जाऊन बॉम्बची विल्हेवाट लावली. बॉम्ब निकामी झाल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी निश्वास सोडला. एनडीए जवळचं असल्याने सराव करत असताना खूप वर्षापूर्वी हा बॉम्ब पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.