Tuesday, July 02, 2024 09:10:20 AM

जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला

जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला

पुणे, १० मे २०२४, प्रतिनिधी : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे.

पुण्यातील मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या दगडूशेठ गणपतीभोवती आंब्याची आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे. दगडूशेठ हलवाई मंदिरावर फुलांनी आंब्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी मनमोहक अशी सजावट करण्यात आली आहे. गणरायाच्या गाभाऱ्यात आणि मंदिरात आंब्याची तोरणेही लावण्यात आली आहेत. त्याचीच काही क्षणचित्रे -

अक्षय तृतीयेच्या पहाटे गणरायाला ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला. दगडुशेठचा आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे. आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवाले, मंदार देसाई आणि परिवाराच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला.दगडूशेठ गणपतीला केलेली आंब्याची आरास पाहण्यासाठी आणि गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे.


सम्बन्धित सामग्री