Friday, December 27, 2024 02:08:01 AM

मोदी, शाहांवर वादग्रस्त पोस्ट केल्याने गुन्हा दाखल

मोदी शाहांवर वादग्रस्त पोस्ट केल्याने गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर, ७ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक रंगात येत असतानाच सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य करण्याचे प्रमाणही वाढत आहे. शहरात नुकतेच २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यात पहिला गुन्हा मुकुंदवाडीत वर तर दुसरा गुन्हा जिन्सीत एका राजकीय व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये वक्तव्य केल्याप्रकरणी मोबाईल धारकावर करण्यात आला. ५ मे रोजी रात्री इंस्टाग्रामवर रिल अपलोड केले होते. त्यात पंतप्रधान मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्या छायाचित्रांचा वापर करून आक्षेपार्हरीत्या एडिटिंग करून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला. शरद म्हस्के यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


सम्बन्धित सामग्री