Saturday, September 28, 2024 10:28:35 PM

उंडणगाव येथे बिबट्याचा सुळसुळाट

उंडणगाव येथे बिबट्याचा सुळसुळाट

छत्रपती संभाजीनगर, २८ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या उंडणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या एक गायीचं वासरू ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. उंडणगाव येथील कैलास धनवई या शेतकऱ्याने आपल्याजवळ असलेल्या शेळ्या व गायीच वासरू रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घरासमोरच्या गोठ्यात बांधल्या.सुमारे रात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर ते गोठयाजवळ गेले असता त्यांना समोर बिबट्याने एका पाठोपाठ आठ शेळ्यांवर हल्ला करत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी मोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला; परंतु या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात एक गायीचं वासरू व आठ शेळ्या जागीच ठार झालेल्या होत्या.यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

संबंधित विभागाला याबाबतीत कल्पना देऊनही वन विभागाने अधिकारी वेळेवर हजर झाले नाहीत. मागील सात, आठ महीन्यापासून या भागात बिबट्याचा उपद्रव सुरू आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. वनविभागाने या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.


सम्बन्धित सामग्री