छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढलाय तर दुसरीकडे अवकाळीने काही जिल्ह्यांना झोडपलयं दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये माळीवाडा शिवारात आंब्याच्या झाडाखाली उभ्या असलेल्या एका शेतमजुराचा अंगावर विज पडून मृत्यू झालाय तर इतर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय. शेतात कांद्याच्या पिकाची काढणी सुरू असताना अचानक पावसाला सुरुवात झाली आणि हे तिघेही जण ढगांचा प्रचंड कडकडाट सुरू झाल्याने आंब्याच्या झाडाखाली आश्रय घेण्यासाठी गेले होते. मात्र क्षणातच त्या ठिकाणी विजेचा लोळ पडला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.