Sunday, October 06, 2024 07:28:02 PM

कर्ज घेऊन घर विकत घ्यावे की भाड्याने रहावे?

कर्ज घेऊन घर विकत घ्यावे की भाड्याने रहावे

मुंबई, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : तुम्हीपण भाड्याच्या घरात राहता आणि आता तुमचे स्वतःचे घर घ्यायचे आहे. साधारणपणे भारतातील प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाला स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते, पण सध्या मालमत्तेच्या वाढत्या किंमती आणि महागाईत लोकांची बचत कमी झाली असून लोक केवळ गृहकर्ज घेऊनच घर किंवा फ्लॅट खरेदीचे आपले स्वप्न पूर्ण करू शकतात. अशा परिस्थितीत, गृहकर्जाचे भरमसाट हप्ते भरून स्वत:चे घर विकत घेण्याची किंवा भाड्याच्या घरात राहण्याची चिंता सतत लोकांना सतावत असते.

स्वतःचा घर खरंच चांगली गुंतवणूक
सर्वप्रथम स्वतःला प्रश्न विचारा की राहण्यासाठी घेतलेलं घर खरंच एक गुंतवणूक आहे का? अर्थशास्त्रात गुंतवणूक म्हणजे त्यावर किती परतावा मिळेल? तुम्ही तुमच्या घराच्या डाऊनपेमेंट आणि कर्जाच्या ईएमआयच्या रकमेतून इतका परतावा मिळवू शकता का जितकं तुम्ही भाड्यावर खर्च करून तुमच्या इतर बचतीतून कमावत आहात? याशिवाय तुमच्या गृहकर्जाच्या ईएमआयमुळे तुमच्या इतर खर्चांवर परिणाम होत आहे की नाही याचेही मूल्यांकन करणे आवश्यक आहे. त्यानंतर घर खरेदी करणं इतर घटकांवरही अवलंबून आहे.

कर्ज घेऊन घर किंवा फ्लॅट खरेदी करणं फायदेशीर व्यवहार ठरत नाही, त्याऐवजी भाड्याने राहण्याचा निर्णय योग्य असू शकतो. दरम्यान, तुमच्यासाठी योग्य पाऊल कोणते याचे तुम्ही स्वतः आकलन केले पाहिजे. सहसा कर्ज घेऊन घर घेतले तर एखाद्या व्यक्तीवर दीर्घकाळासाठी कर्जाचा बोजा पडतो कारण सामान्यतः गृहकर्ज २० वर्षासाठी घेतले जाते. त्यामुळे कर्ज काढून घर घ्यायचं की भाड्याने राहायचं हे एखाद्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते…

  1. घर खरेदी करण्याचा निर्णय व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, जबाबदाऱ्या आणि कुटुंबाची मालमत्ता व उत्पन्न यावर अवलंबून असतो.
  2. 2. घर खरेदी करणं तुमच्या आयुष्याचे ध्येय असू शकते, पण गृहकर्जाच्या ईएमआय दीर्घकाळ तुमच्या इतर खर्चांवर परिणाम करतो.
  3. गृहकर्जाचा ईएमआय साधारणपणे मासिक भाड्यापेक्षा जास्त असतो, त्यामुळे सर्वप्रथम होम लोनचा तुमच्या इतर आर्थिक उद्दिष्टांवर परिणाम होणार नाही याची खात्री केली पाहिजे.
  4. आपण स्वतःच घर असल्यास व्यक्तीला स्थिरता मिळते, तर भाड्याने राहिल्यास लिक्विडीटी मिळते. भाड्याच्या घरात राहिल्यास नोकरी बदलण्यास कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. याउलट तुमचे स्वतःचे घर असल्यास तुम्ही अशा जोखमी टाळता, ज्यामुळे तुमच्या करिअरच्या वाढीवर परिणाम होतो.
  5. याशिवाय पुरेशी बचत आणि मालमत्तेच्या एकूण किंमतीच्या ५०% डाउन पेमेंट करण्याच्या स्थितीत नसल्यास व्यक्तीने गृहकर्ज घेऊ नये, असा सल्ला तज्ज्ञही देतात.

सम्बन्धित सामग्री