Friday, July 05, 2024 02:50:38 AM

नेटच्या परीक्षेचा नवा नियम

नेटच्या परीक्षेचा नवा नियम

मुंबई, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) संदर्भात मोठा निर्णय घेतलाय. चार वर्षांची पदवी घेणारे विद्यार्थी आता थेट यूजीसी नेटची परीक्षा देऊ शकतात आणि पीएचडी करू शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हा निर्णय घेतलाय. जेआरएफ सह किंवा त्याशिवाय पीएचडी करण्यासाठी ४ वर्षांच्या अंडरग्रॅजुएट प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के गुण किंवा समतुल्य ग्रेड मिळालेली असावी असं यूजीसीने म्हटलंय.

सध्याच्या प्रणालीमध्ये राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी, विद्यार्थ्यांना केवळ ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. नवीन नियमांनुसार आता चार वर्षांची पदवी असलेले विद्यार्थीही या परीक्षेला बसू शकतात. यूजीसीचे अध्यक्ष प्रोफेसर एम जगदीश कुमार यांच्या मते, जे विद्यार्थी चार वर्षांचा अंडरग्रॅजुएट प्रोग्राम पूर्ण करतात आणि पदवी प्राप्त करतात ते थेट पीएचडी करण्यासाठी पात्र मानले जाणार आहेत, तसेच ते हे विद्यार्थी नेट परीक्षाही देऊ शकतात.

मात्र यासाठी यूजीसीने काही अटीही ठेवल्यात. ज्या विद्यार्थ्यांनी एफआययूपी पूर्ण केले आहे किंवा ८ सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर पदवीचे शिक्षण घेत आहेत ते या नवीन प्रणालीनुसार पात्र असतील. चार वर्षांची पदवी पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के गुण असणं आवश्यक आहे. गुणांऐवजी ग्रेड देण्याची पद्धत असून तेथे ७५ टक्के गुणांच्या बरोबरीचा ग्रेड असावेत. एसी, एसटी, ओबीसी, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये काही सूट दिली जाणार आहे.


सम्बन्धित सामग्री