Thursday, June 27, 2024 08:37:16 PM

नेवासा आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर

नेवासा आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर

अहमदनगर, प्रतिनिधी, दि. २१ एप्रिल २०२४ : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आरोग्य विभागा अंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भरविण्यात आले होते. यासाठी अनेक गावातून प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या कार्यक्षेत्रातील गोरगरीब महिला रुग्णांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर नेवासा तालुक्यातील वडाळा येथील FJFM या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले.

https://youtu.be/SgllWHQFn4w

मात्र रुग्णांची कुठल्याही प्रकारची सोय नसताना तसेच पुरेसे बेड उपलब्ध नसताना देखील आरोग्य यंत्रणेने फक्त आणि फक्त त्यांच्या केसेस टार्गेटसाठी १४० हून अधिक ऑपरेशन केल्याचे उघड झाले आहे. नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आणला. एकीकडे पाऊस, त्यात लाईट गेलेली आणि अपुरी बेड व्यवस्था यामुळे अनेक महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपण्याची वेळ आल्याचं यातून समोर आलं आहे.


सम्बन्धित सामग्री