Tuesday, July 02, 2024 09:16:21 AM

पैठण तालुक्यात पाण्याचे भीषण संकट

पैठण तालुक्यात पाण्याचे भीषण संकट

छत्रपती संभाजीनगर, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सध्या पैठण तालुक्यात सर्वञ पाण्याचे दुर्भिक्षय निर्माण झाले आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ ओढावल्याचे दिसत आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातही केवळ १६ टक्के पाणी शिल्लक आहे.  धरण उशाला असून देखील तालुक्यातील नागरिकांच्या नशिबी सदैव  पाण्याची समस्या ही पाचविला पुंजलेलीच आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे हे दुर्देवी की  फुटलेले नशीबच म्हटलं तरी वावगे ठरु नये. कारण धरण ज्या तालुक्यात आहे. त्याच मुळ गावांना दरवर्षी पाऊस कमी झालं की भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो असे चिञ दरवर्षीचेच झालेले आहे. अक्षरक्ष गुराढोरांनाही पाणी विहिरीतून शेंदूर पाजावं लागत आहे.


सम्बन्धित सामग्री