Thursday, July 04, 2024 09:22:17 AM

विवाहाचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक

विवाहाचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक

छत्रपती संभाजीनगर, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरच्या धनवट शिवारात लग्न लावून देतो म्हणत मुलांकडून चक्क पन्नास हजारांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुलांचे विवाह रखाडल्याने बोगस लग्न लावून आर्थिक फसवणूक होत असल्याचा प्रकार सुरू असताना असेच बोगस लग्न लावून देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या सात जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा फर्दापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींमध्ये दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. सोयगाव तालुक्यातील धनवट शिवारातील वाघूर नदीकाठी असलेल्या चौंडेश्वर मंदिर येथे आरोपींनी मुलाकडून  ५५ हजार रुपये घेऊन बोगस विवाह लावून दिला होता. दरम्यान विवाह रखडलेल्या मुलांच्या परिवाराने अनोळखी व्यक्तींवर लग्न लावून देतो म्हणून पैशाची मागणी करणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये तसेच ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झालेली असेल त्यांनी पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन पोलीस सहायक निरीक्षक प्रफुल साबळे यांनी केले आहे.


सम्बन्धित सामग्री