Monday, July 01, 2024 02:13:35 AM

पुण्यात बालचित्रपट महोत्सवाला सुरूवात

पुण्यात बालचित्रपट महोत्सवाला सुरूवात

पुणे, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यात उन्हाळयाच्या सुट्टीत दरवर्षी आकर्षण असलेल्या बालचित्रपट महोत्सवाला शुक्रवारपासुन सुरूवात झाली असून हा महोत्सव २५ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. या महोत्सवाला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योगपती कृष्णकुमार गोयल आणि राजु कावरे उपस्थित होते.

यावेळी आकाशात फुगे सोडुन या महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. लहान मुलांनी महोत्सवात मोठया संख्येने सहभाग घेतला. पुढील सात दिवस वेल डन बाँईज, ताजमाल, म्होरक्या, उंबुटू, जिप्सी असे बालचित्रपट दाखविले जाणार आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात ‘संवाद पुणे’ या संस्थेचे विशेष असं महत्व असून गेली २४ वर्षे या बालचित्रपट महोत्सवाचे सातत्य टिकवून ठेवणे ही विशेष बाब असून यापुढे आंतरराष्ट्रीय बालचित्रपट व्हावा याकरता विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.


सम्बन्धित सामग्री