Tuesday, July 09, 2024 12:50:25 AM

दिव्यांग मतदारांना सहाय्य करणार, रिक्षा संघटनेचा महत्त्वपूर्ण निर्णय

दिव्यांग मतदारांना सहाय्य करणार रिक्षा संघटनेचा महत्त्वपूर्ण निर्णय

अकोला, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी रिक्षा संघटनेने पुढाकार घेतला असून, दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विनामूल्य ने-आण करण्याचा निर्णय अकोला ऑटो संघटनेने घेतला आहे.अकोला (पश्चिम) विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव यांच्या दालनात अकोला रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेतला आहे. 


सम्बन्धित सामग्री