Thursday, July 04, 2024 10:05:20 AM

दिलीपसिंह उर्फ शाहू दत्तक प्रकरण

दिलीपसिंह उर्फ शाहू दत्तक प्रकरण

कोल्हापूर, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार दिलीपसिंह (बदलेल नाव शाहू) यांना कोल्हापूरात दत्तक घेण्याला कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने कडाडून विरोध केला होता. हिंदूद्वेष्टा माणूस गादीवर बसू नये म्हणून कोल्हापूरकरांनी २४ जून १९६२ रोजी न्यू पॅलेसवर मोठा उग्र मोर्चा काढला होता आणि मोठया प्रमाणात दगदफेक करण्यात आली होती. पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या तसेच लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी न्यू पॅलेसच्या कंपाउंडवरून संतप्त जनता उड्या मारून आत गेली. न्यू पॅलेसवर काळे निशाण फडकवण्यात आले. काँग्रेस उमेदवार दिलीपसिंह उर्फ शाहुंना विरोध करण्यासाठी ३ जुलै १९६२ रोजी संपूर्ण कोल्हापूरात लोकांनी आपापल्या घरांवर काळे निशान फडकवले आणि हरताळ पाळले. संपूर्ण कोल्हापूरात दिलीपसिंह विरोधी आंदोलनाचा भडका उडाला होता.

शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर टेलिफोन तारा तोडण्यात आल्या. खांब वाकवण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालय बंद पाडले. जनतेच्या जनआक्रोशाची दखल त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री लालबहाद्दूर शास्त्री व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी घेतली. त्यांनी भेट घेऊन दत्तक प्रकरणावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. कोल्हापुरात दिलीपसिंह विरोधी भावना इतक्या तीव्र होत्या की त्यांना दत्तकविधी बाहेर बेंगुळुरात उरकावा लागला व त्यानंतर जवळजवळ २० वर्षे काँग्रेस उमेदवार दिलीपसिंह यांना कोल्हापूरात फिरणे अवघड झाले होते. म्हणूनच पुढची २० वर्षे कोल्हापूरचा शाही दसरा सोहळाच रद्द करण्यात आला. यानंतर झालेल्या १९६७ व १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा कोल्हापूरात दारुण पराभव झाला व दत्तक विरोधी चळवळीचे नेतृत्व करणारे विजयमाला राणीसाहेब व मेजर दादासाहेब निंबाळकर यांचे पुत्र आर.डी.निंबाळकर हे अनुक्रमे हातकणंगले व कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेत पोहचले.

हिंदूपदपातशहा असे बिरुद असणाऱ्या गादीवर हिंदुविरोधी व्यक्ती नसावा व लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची नात प्रिन्सेस पद्माराजे यांच्या पुत्रांचा गादीवर बसण्याचा नैसर्गिक अधिकार डावलला जाऊ नये या भावनेतून कोल्हापूरच्या जनतेने नागपूरच्या दिलीपसिंह उर्फ शाहू यांच्याविरोधात मोठा लढा दिला. जरी त्यांनी बळजबरीने गादी बळकावली असली तरी ते जनतेच्या मनावर कधीच राज्य करू शकले नाहीत. म्हणूनच २००९ ला त्यांच्या मोठया मुलाचा अपक्ष उमेदवाराने लोकसभेत व राजेश क्षीरसागरांनी छोट्या मुलाचा विधानसभेत पराभव केला. आता लोकसभा निवडणुकीसाठी स्वतः दिलीपसिंह काँग्रेसच्या तिकिटावर उभे आहेत.

पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशमधील पीडित शोषित असहाय्य निर्वासित हिंदू व शिखांना भारतात नागरिकत्व व आसरा देऊ नये म्हणून कोल्हापूरातील जिहादी मुसलमानांना गोळा करून या दिलीपसिहांनी मोर्चा काढला होता. दिलीपसिहांचा निवडणुकीत पराभव हीच खरी  हिंदूंच्या संरक्षणासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांना व ज्यांच्या पुत्रांचा गादीवर बसण्याचा नैसर्गिक अधिकार नाकारण्यात आला. त्या कोल्हापूरकरांच्या जनप्रिय राजर्षी शाहू महाराजांची नात प्रिन्सेस पद्माराजे आणि देशाच्या फाळणीनंतर मुस्लिमांच्या छळामुळे बांगलादेश व पाकिस्तानमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लाखो हिंदू बांधवाना आदरांजली ठरेल.


सम्बन्धित सामग्री