Monday, July 01, 2024 03:22:56 AM

बारामतीत ४ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

बारामतीत ४ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

पुणे, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी चार अपक्ष उमेदवारांनी अर्ज घेतले असून आतापर्यंत एकूण चार अपक्ष उमेदवारांनी बारामती लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरले आहेत. महेश भागवत, संदीप देवकाते, सचिन आगवणे आणि शुभांगी धायगुडे अशी या चार अपक्ष उमेदवारांनी अर्ज खरेदी केले. तर सोमवारी एकूण ५६ अर्जाची विक्री झाली. १९ एप्रिल बारामती लोकसभा मतदारसंघाचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.


सम्बन्धित सामग्री