Tuesday, July 02, 2024 11:53:03 PM

मध्य रेल्वे चालवणार उन्हाळी विशेष ट्रेन

मध्य रेल्वे चालवणार उन्हाळी विशेष ट्रेन

मुंबई, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी तसेच आपल्या मूळ गावी जाणाऱ्यांची शक्यता जास्त असते. अशा प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईतुन तब्बल ९२ विशेष उन्हाळी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या आरक्षण बुकींसाठी सुरुवात झाली आहे. प्रवाशांना प्रत्यक्ष तिकीट घर येथे जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने तिकीट बूक करता येणार आहे.

मुंबईत परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या विशेष उन्हाळी गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बनारस (०११३७) साप्ताहिक विशेष गाडीच्या १० फेऱ्या होणार असून ही साप्ताहिक विशेष गाडी २१ एप्रिल ते १९.मे पर्यंत दर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी २.३० वाजता सुटणार आहे.

ही गाडी दुसऱ्या दिवशी ९ बनारस येथे पोहोचेल. तर ०११३८ साप्ताहिक विशेष गाडी ही २२ एप्रिल ते २० मे दरम्यान, दर सोमवारी रात्री ११ वाजता बनारस येथून सुटेल ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ०४.१० वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी आणि वाराणसी येथे थांबे देण्यात आले आहेत.


सम्बन्धित सामग्री