Saturday, April 12, 2025 05:29:45 PM

विजेची गरज वाढली, सरकार करणार उपाययोजना

विजेची गरज वाढली सरकार करणार उपाययोजना

मुंबई, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सध्या देशात उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात वाढलाय. बहुंताश भागात तापमानाचा पारा हा ४० अंशाच्या पुढ गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही भागात अवकाळी पाऊस होतोय. दरम्यान, या उन्हाळ्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ होतेय. विजेची गरज भागवण्यासाठी वायू-आधारित विद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सरकारकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांतून अधिकाधिक वीजनिर्मिती होण्याची खबरदारी घेण्यासाठी कलम ११ अंतर्गत निर्देश जारी करण्यात आलेत.

देशात वाढली विजेची गरज

उन्हाळ्यात देशात वाढलेली विजेची गरज भागवण्यासाठी भारत सरकारने वायू-आधारित वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांतून अधिकाधिक वीजनिर्मिती होण्याची खबरदारी घेण्यासाठी सरकारने विद्युत कायदा २००३ च्या कलम ११ अंतर्गत वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांना निर्देश जारी केले आहेत. कलम ११ नुसार असामान्य परिस्थितीत उचित सरकार एखाद्या वीजनिर्मिती कंपनीकडे, त्या सरकारच्या निर्देशांनुसार, कोणतीही वीजनिर्मिती केंद्रे चालवण्याची किंवा सांभाळण्याची जबाबदारी सोपवू शकते. मुख्यत्वे व्यावसायिक कारणांमुळे, GBS म्हणजे वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्रांचा बहुतांश भाग सध्या वापरात नाही. कलम ११ अंतर्गत काढलेले निर्देश, आयात केलेल्या कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रांकरिता काढलेल्या निर्देशांशी मिळतेजुळते आहेत.


सम्बन्धित सामग्री