Friday, July 05, 2024 04:07:21 AM

पाणी टँकरलाही जीपीएस!

पाणी टँकरलाही जीपीएस

छत्रपती संभाजीनगर, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : जिल्ह्यातील टंचाई स्थितीचा मुकाबला करताना पिण्याच्या पाण्याचे उपलब्ध स्रोत, पाण्याची दैनंदिन गरज याचे अनुमान घेऊन जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन तालुकास्तरावर करावे व तसा परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा,’ असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.

विभागात एक हजारच्यावर टँकर

मराठवाड्यातील एकूण ७१४ गावे व २१० वाड्यांना एक हजार ५८ टँकरद्वारे सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३११ गावे व ४८ वाड्यांना ४७३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासह जालन्यातील २१३ गावे व ५५ वाड्यांना ३३६ टँकरद्वारे, बीड जिल्ह्यातील १४० गावे व १०५ वाड्यांना मिळून १७१ टँकरद्वारे, धाराशिव जिल्ह्यातील ४० गावांना ६६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परभणीत एक, लातुरात आठ, तर नांदेड जिल्ह्यात तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.


सम्बन्धित सामग्री