Wednesday, July 03, 2024 12:39:36 AM

नाशिक शहराचा पारा चढला

नाशिक शहराचा पारा चढला

नाशिक, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : नाशिकमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाका वाढल्याचा पाहायला मिळत आहे. सरासरी नाशिकचे तापमान ३८ ते हे ३९ अंशपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे नाशिक शहरात उष्माघाताचे रुग्णा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक शहरात मागील तीन दिवसांपूर्वी ३८.९ अंश सेल्सिअस तापमान पोचले होते तर ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान हे स्थिर आहे. पुढील मे महिन्यात उन्हाचा चटका अधिक वाढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेकडून शासनाच्या सूचनेनुसार उष्माघाताचे बेड तयार ठेवण्यात आले आहेत. नाशिक महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात १२ तर उर्वरित चार रुग्णालयांमध्ये प्रत्येकी चार असे एकूण २८ उष्माघाताचे बेड आरक्षित करण्यात आल्याची माहिती नाशिक मनपा वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.

उष्माघाताचे लक्षणे पुढीलप्रमाणे

मळमळ, उलटी, हात-पायांत गोळे येणे, थकवा येणे, जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे. क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी, अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी आहेत.


सम्बन्धित सामग्री