Friday, November 22, 2024 12:21:06 AM

बाबासाहेबांची सही असलेल्या विशेष पेनची निर्मिती

बाबासाहेबांची सही असलेल्या विशेष पेनची निर्मिती

पुणे, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मौलिक विचारांचा वारसा युवा पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आणि वाचनाप्रमाणेच लेखन संस्कृतीच्या प्रसारासाठीही डॉ. बाबासाहेबांच्या सिग्नेचर एडिशनच्या पेनचे विशेष महत्त्व आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले. नव्या शैक्षणिक धोरणातील विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी या उपक्रमातून प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले.

येत्या १४ एप्रिलला असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधत पुण्यातील ‘रायटिंग वंडर्स’ या संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सही असलेल्या विशेष पेनची निर्मिती करण्यात आली आहे. भांडारकर रस्त्यावरील पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या विशेष पेनने स्वाक्षरी करून या पेनचे औपचारिक अनावरण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या सिग्नेचर एडीशन पेनसाठी उच्च दर्जाच्या प्रिमिअम जर्मन रिफीलचा वापर केला आहे. दोन टोन मेटल बॉडी असून  डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा आणि स्वाक्षरी या पेनवर कलात्मक पद्धतीने कोरली आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo