कोल्हापूर, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या घर बांधणी अनुदानासाठी चार कोटी दहा लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. सलग पंचेचाळीस दिवस अभयण्यग्रस्तांनी जिल्हा वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यातील आश्वासनानुसार प्रस्तावित घर अनुदानापोटी सदर निधी उपलब्ध झाला आहे.