Wednesday, October 02, 2024 10:51:41 AM

अंबाबाई देवीचं दर्शन दोन दिवस राहणार बंद

अंबाबाई देवीचं दर्शन दोन दिवस राहणार बंद

कोल्हापूर, १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीचं दोन दिवस संवर्धन करण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक १४ आणि १५ एप्रिल रोजी देवीचं दर्शन बंद राहणार आहे. भाविकांना दर्शनासाठी पितळी उंबऱ्याच्या बाहेर कलश आणि उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ही माहिती दिली आहे.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याने तातडीने संवर्धन करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी दिला आहे. मूर्ती संवर्धनासंबंधीचा दावा दिवाणी न्यायाधीश यांच्यासमोर सुरू आहे. न्यायालयीन आदेशानंतर पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर.एस. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी १४ आणि १५ मार्च रोजी केलेल्या पाहणीचा अहवाल न्यायालयात सादर केला होता.

अहवालानुसार भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने करवीर निवासी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन दिनांक १४ आणि १५ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. यादरम्यान भाविकांना देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी पितळी उंबऱ्याच्या बाहेरून कलश आणि उत्सव मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.


सम्बन्धित सामग्री