Monday, July 08, 2024 01:33:33 AM

ट्रेनमधील चेन ओढली तरी दंड होणार नाही ? जाणून घ्या हा नियम…

ट्रेनमधील चेन ओढली तरी दंड होणार नाही  जाणून घ्या हा नियम…

मुंबई, प्रतिनिधी, दि. १० एप्रिल २०२४ : भारतीय रेल्वेकडून दररोज शेकडो ट्रेन धावतात. ज्यामध्ये विविध राज्यातून लाखो लोक प्रवास करतात. या रेल्वेतून प्रवास करत असताना विनाकारण ट्रेनची चेन ओढल्यास १ हजार रुपये दंड आणि एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ट्रेनमध्ये अनेक नियम आहेत, जे सर्व प्रवाशांना पाळावे लागतात.

रेल्वेच्या अनेक नियमांपैकी एक नियम रेल्वेची चेन ओढण्याबाबत आहे, ज्याबद्दल अनेक लोकांना माहिती नाही. ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही प्रत्येक डब्यात एक लाल रंगाची चेन असते. जी ओढल्यानंतर ट्रेन लगेच थांबते. या चेनचा वापर आपत्कालीन परिस्थितीदरम्यान केला जातो. परंतु अनेकवेळा लोक त्याचा वापर मौजमजेसाठी किंवा स्टेशनवरून उतरण्यासाठी करतात असे दिसून आले आहे. विनाकारण ट्रेनची चेन ओढल्यास १ हजार रुपये दंड आणि एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आता प्रश्न असा आहे की, या चेनचा तुम्ही कधी वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक पैसाही दंड होणार नाही. तुम्ही अनेक कारणांमुळे चेन ओढू शकता. यामध्ये मेडिकल इमर्जन्सी असेल, डब्यात आग लागली असेल, दरोडा पडला असेल किंवा कोणताही अपघात झाला असेल तर तुम्ही ट्रेनची चेन ओढू शकता.


सम्बन्धित सामग्री