Sunday, July 07, 2024 12:10:13 AM

पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सातारा, पुण्याला सर्वाधिक झळ

पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त सातारा पुण्याला सर्वाधिक झळ

पुणे, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालल्याने  पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ जाणवू लागला आहे. त्यामुळे पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा वगळता पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांत मिळून ३३४ गावांतील तब्बल सहा लाख ७२ हजार ८०७ नागरिकांना ३६४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक झळ सातारा आणि पुणे जिल्ह्यांना बसत आहे. उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर अद्यापही सुरूच असून टँकरच्या संख्येत आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक पाणी न मिळाल्याने त्रासलेले आहेत.

                    

सम्बन्धित सामग्री