Tuesday, July 02, 2024 09:12:35 AM

जागतिक ऑटिझम दिवस ; शंभर मुलांमागे एक ऑटिझमचा रूग्ण

जागतिक ऑटिझम दिवस  शंभर मुलांमागे एक ऑटिझमचा रूग्ण

नाशिक, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लहान मुलांमध्ये निदान होणाऱ्या ऑटिझम या मानसिक विकाराचे रुग्ण वाढत आहेत. आपल्याकडे शंभर बालकांमागे एका ऑटिझमचे निदान होत असून मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये हा विकार दिसून येण्याचे प्रमाण अधिक आहे. या आजाराबाबत जनजागृती नसल्याने निदान होण्यात देखील अडचणी येत असल्याची माहिती मानसोपचार तज्ज्ञांनी दिली.

२००७ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने २ एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम जागरूकता दिन म्हणून घोषित केला. जगभरातील मुलांमध्ये होणारा हा मानसिक विकार रोखणे, त्याबाबत पालकांमध्ये जागरूकता करणे या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो.  


सम्बन्धित सामग्री