Thursday, July 04, 2024 10:50:27 AM

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार

मुंबई, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबई व पुणे येथे यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत  ३ व ४ एप्रिल रोजी दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. गॅन्ट्री बसविताना सदर कालावधीत मुंबई व पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने किवळे ब्रिजवरुन जुन्या मुंबई- पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात येतील. मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका (लोणावळा एक्झिट) येथून जुन्या मुंबई- पुणे मार्गावरुन पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होतील.


सम्बन्धित सामग्री