Wednesday, October 02, 2024 10:59:30 AM

मुलींनी लिहलं पुस्तकं

मुलींनी लिहलं पुस्तकं

सातारा, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : गृहपाठ करता-करता चिमुकल्या हातांनी पेन हाती घेतला. त्या पेनने केवळ गृहपाठच नव्हे तर वेगवेगळ्या गोष्टी कागदावर उतरवल्या. या गोष्टींचे पुस्तक तयार झाले आणि या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही थेट मंत्र्यांच्या हस्ते पार पडला. पाटण तालुक्यातील मुळगावच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्या मुलींनी ही किमया केली. एक-दोन नव्हे तर तब्बल २८ गोष्टींचे ५२ पानी पुस्तक या विद्यार्थीनींनी लिहिले आहे. ‘मुळगावच्या मुलांच्या गोष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

                 

सम्बन्धित सामग्री