Sunday, June 30, 2024 09:48:52 AM

आमगावात पर्यावरण पूरक होळी साजरी

आमगावात पर्यावरण पूरक होळी साजरी

गोंदिया, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : गोंदिया जिल्ह्यात होळीच्या सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होळीनिमित्त अनेक ठिकाणी होळी दहन करण्यात येते. होळी दहनांमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर करण्यात येतो. लाकडांचा वापर केल्यामुळे अनेक ठिकाणी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येते. त्यामुळे वृक्ष संवर्धनाला कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता असते. त्यामुळेच या वृक्ष संवर्धनासाठी आणि पर्यावरण पूरक होळी साजरा करण्यासाठी अनेक नागरिक सरसावत असल्याचे आपल्याला दिसून येते. अशीच एक होडी आमगाव शहरांमध्ये तयार करण्यात आली आहे. ५१०० शेणाच्या गौऱ्यापासून होळी तयार करण्यात आली. वृक्षतोड थांबावी हा सामाजिक संदेश होळीच्या माध्यमातून देण्यात आला. होळीवर आकर्षक अशी होलिका आणि भक्त प्रल्हादाची मूर्ती तयार करण्यात आली. आमगाव शहरातील या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री