Sunday, July 07, 2024 01:20:01 AM

२७२ गावांना अवकाळीचा तडाखा

२७२ गावांना अवकाळीचा तडाखा

अकोला, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : रब्बी हंगामातील पिके ऐन सोंगणीला आली असताना गत महिन्यात दि.२६ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घालीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शुक्रवारी (दि. २२) शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यानुसार, जिल्ह्यात २७२ गावांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. अंतिम सर्वेक्षण अहवालानुसार जिल्ह्यातील ९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, २१ कोटी १० लाख ३१ हजार ४८२ रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केला आहे.

              

सम्बन्धित सामग्री