Sunday, June 30, 2024 09:59:15 AM

होळीनिमित्त शहरात साखरगाठीचे दुकाने थाटले

होळीनिमित्त शहरात साखरगाठीचे दुकाने थाटले

छत्रपती संभाजीनगर, २३ मार्च २०२३, प्रतिनिधी : होळी सणाला साखरगाठीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. लहान मुलांच्या गळ्यातही साखरगाठी घालून हा सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी महिला देखील साखरगाठीचे वेगवेगळे दागिने परिधान करतात तशी अनेक भागात प्रथा आहे. यंदा साखरगाठीची चाळीस रुपयांनी भाव वाढ झाली आहे. साखरगाठीसाठी सागवानी साचे वापरले जातात. एक किलोचा साच्या दीड हजार रुपयांवरून ३ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला असून ७० रुपये किलोचा लिंबू २०० रुपयांवर मिळतो आहे. परिणामी साखरगाठीचे भाव चाळीस रुपयांनी वधारून सध्या २४०-२८० रुपये किलो झाले आहेत.


सम्बन्धित सामग्री