Sunday, June 30, 2024 10:06:18 AM

होळीच्या होमाआधी थाप मारण्याची आगळी वेगळी परंपरा

होळीच्या होमाआधी थाप मारण्याची आगळी वेगळी परंपरा

खेड, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : कोकण आणि शिमगा याचं एक वेगळंच समीकरण आहे. कोकणात शिमगोत्सवाची सध्या धामधूम सुरू आहे. वेगवेगळ्या गावी शिमाग्याच्या वेगवेगळ्या परंपरा दिसून येतात. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील गावांमध्ये अशीच एक घरावर थाप मारण्याची आगळी वेगळी परंपरा आहे. चाकाळ या गावातील तमासगीर मंडळी होळीच्या पाच दिवस अगोदर पंचक्रोशीत घरोघरी थाप मारत फिरतात. याचे आकर्षण म्हणजे यावेळी एक मुलगा स्त्री वेशात वग सादर करतो. ढोलकी, तुणतुणं आणि डफ यांच्या साहाय्याने हा वग सादर होतो. यावेळी घरातील मंडळी यांची आरतीही करतात.


सम्बन्धित सामग्री