Tuesday, July 02, 2024 09:30:17 AM

वाहनचालकांकडून प्लास्टिक पिशव्या बंदीची मागणी

वाहनचालकांकडून प्लास्टिक पिशव्या बंदीची मागणी

ठाणे, २३ मार्च २०२४, प्रितिनिधी : प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला बंदी असतानाही होळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या पिशव्या फेकल्या जात आहेत. वाहन चालकांवर या पिशव्या फेकल्या जात असल्याने अपघाताची भीती वाढली आहे. मात्र, याबाबत कोणतीही कारवाई केली जात नसल्याची वाहनचालकांची तक्रार आहे. कल्याण-डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे फुगे फेकले जात असून, कल्याण शीळ रोडवरील कोन – भिवंडी हायवेवर मोठ्या प्रमाणावर फुगे फेकले जात असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. कल्याण शीळ रोड हा हायवे असल्याने या रस्त्यावर वाहनांचा वेग प्रचंड असतो. वेगाने जाणाऱ्या वाहनचालकावर फुगे फेकले जात असल्याने यातून अपघात होण्याची भीती वाहनचालक व्यक्त करत आहेत. पोलिसांकडून या उपद्रवीवर कारवाई केली जावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.


सम्बन्धित सामग्री