Saturday, October 05, 2024 03:03:30 PM

डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार

डॉ विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार

पुणे, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कारासाठी ड. भटकर यांची निवड केली. सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरविण्यात येणार आहे.

पुरस्कराचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. बालशिवाजींची, सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती, या नगरीच्या ग्रामदैवतांसह वैशिष्ट्यपूर्ण अशा या पुण्यभूषण पुरस्काराच्या स्मृतीचिन्हात आहे. रु. २,००,००० (रुपये दोन लक्ष) रकमेची थैलीही सन्मानित पुणेकरास दिली जाते. याबरोबरच कर्तव्य बजावित असताना जखमी झालेल्या ४ जवानांचा आणि एका वीरमातेचा मान्यवरांचे शुभहस्ते यथोचित गौरव करण्यात येतो. पुण्यभूषण पुरस्कार प्रदान समारंभ जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात येईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी, मनोहर जोशी, शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिल देव आणि सचिन तेंडुलकर, पांडुरंगशास्त्री आठवले, विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम्, मधु दंडवते, पत्रकार एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सुशीलकुमार शिंदे, सिताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, महेश एलकुंचवार, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. विकास आमटे, आशा भोसले, नारायणमूर्थी, शरद यादव, नितीन गडकरी, पं.हरिप्रसाद चौरसिया, पं. अमदजअली खान व पं. शिवकुमार शर्मा, प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री