Saturday, October 05, 2024 03:48:20 PM

संघ शताब्दीच्या तयारीला

संघ शताब्दीच्या तयारीला

नागपूर, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत रविवारी सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची पुनर्निवड करण्यात आली. त्यानुसार, २०२७ पर्यंत त्यांच्याकडे सरकार्यवाहपदाची जबाबदारी असणार आहे. संघाच्या रचनेत सरकार्यवाह या पदाला महत्त्वाचे मानले जाते. सरकार्यवाह हे संस्थेचे कार्यकारी प्रमुख असतात आणि संघाचे कामकाज चालवतात. रेशीमबागेत दर तीन वर्षांनी होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत सरकार्यवाह निवडण्यात येतात. त्यानुसार, यंदा ही प्रक्रिया पार पाडली. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका आणि संघाचे शताब्दी वर्ष या पार्श्वभूमीवर होसबळे सरकार्यवाहपदी कायम राहतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. ती अपेक्षा अखेर रविवारी खरी ठरली आणि सर्वानुमते सरकार्यवाहपदी होसबळे यांची पुनर्निवड झाल्याची घोषणा संघाद्वारे करण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी २०२४ - २७ या कालावधीसाठी सहा सहसरकार्यवाहांची नियुक्ती केली. कृष्ण गोपाल, मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त चक्रधर, अतुल लिमये आणि आलोक कुमार यांची सहसरकार्यवाहपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अतुल लिमये आणि आलोक कुमार अशी दोन नवीन सहसरकार्यवाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता पाच ऐवजी आता सहा सहसरकार्यवाह (सहसचिव) करण्यात आले आहेत. मनमोहन वैद्य यांना सहसरकार्यवाह पदावरून मुक्त करण्यात आले आहे. अतुल लिमये हे महाराष्ट्र कार्यक्षेत्र, पश्चिम विभागाचे क्षेत्र प्रचारक होते. आलोक कुमार राष्ट्रीय सह-प्रचार प्रमुख पदावर कार्यरत आहेत, त्यापूर्वी ते पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रचारक होते.

होसबळे कोण आहेत ?

जन्म १९५४मध्ये कर्नाटकातील होसाबळे गावात झाला.
बंगळुरू विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
१९६८मध्ये वयाच्या १३व्या वर्षी संघाचे स्वयंसेवक झाले.
१९७२मध्ये अभाविपत सामील झाले.
१९७८मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर संघाचे प्रचारक बनले.
१९९२ ते २००३ संघटनेचे संघटना मंत्री होते.
२००३मध्ये संघाचे अखिल भारतीय सह-बौद्धिक प्रमुख बनले.
२००९ ते २०२१ संघाचे सह-सरकार्यवाह म्हणून काम केले.
असिमा या कन्नड मासिकाचे संस्थापक संपादक आहेत.


सम्बन्धित सामग्री