Sunday, April 06, 2025 12:26:00 PM

महाराष्ट्रात भाजपा एक पाऊल पुढे

महाराष्ट्रात भाजपा एक पाऊल पुढे

मुंबई,२० मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची तयारी सगळ्या पक्षांकडून केली जात आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दरम्यान आता भाजपा दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी जोरदार तयार करत आहे. बुधवारी वर्धा आणि अकोला जिल्ह्यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बैठका घेणार आहेत. ह्या कोअर कमिटी आणि निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठका होणार आहेत. महाविकास आघाडीकडून पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या घोषणा झालेल्या नाहीत. तर दुसरीकडे भाजपा एक पाऊल पुढे असलेली पाहायला मिळत आहे.


सम्बन्धित सामग्री