Tuesday, December 03, 2024 10:49:33 PM

नाशकात गांजा आणि ड्रग्ज जप्त

नाशकात गांजा आणि ड्रग्ज जप्त

नाशिक, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील म्हसरूळ परिसरात तब्बल १०१ किलो गांजा आणि १९ ग्रॅम ड्रग्ज पोलिसांकडून जप्त करण्यात आले. पोलिसांनी सापळा रचत २० लाख रूपयांचा गांजा जप्त करण्याचा हा प्रकार उघडकीस आणला. तर दुसरीकडे नाशिक रोड भागात ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका इस्माकडून १९ ग्रॅम ड्रग पावडर हस्तगत करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून नाशिकमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिस अमली पदार्थ विरोधी मोहिम राबवत आहेत. या मोहिमेत त्यांना यश मिळाले आहे.

              

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo