Sunday, October 06, 2024 03:56:50 AM

आदर्श घोटाळा प्रकरण चौघांना सहाव्यांदा अटक

आदर्श घोटाळा प्रकरण चौघांना सहाव्यांदा अटक

छत्रपती संभाजीनगर, २० मार्च २०२४, प्रतिनिधी :  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बहुचर्चेत असलेल्या आदर्श बँक घोटाळा प्रकरणातील नवीन माहिती समोर आली आहे. या कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणातील चार आरोपींना सहाव्यांदा अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील कोटींच्या १३ घोटाळा प्रकरणात ही कारवाई केली. चारही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपी अंबादास आबाजी मानकापे, सुनील अंबादास मानकापे, वनिता सुनील पाटील, सविता देविदास अधाने  अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. अमानउल्ला हामेदखान पठाण हे लेखापरीक्षक असून त्यांनी आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे २०२२ ते २०२३ या कालावधीचे लेखापरीक्षण केले होते. त्यात त्यांना चार कोटींचे बनावट कर्ज वाटप केल्याचे आढळले होते. त्यावरून १९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक सुप्रिया केंद्रे यांनी तपास करून चार कोटींचे बनावट कर्ज आणि ठेवीदारांचे नऊ कोटी, असा १३ कोटींचा अपहार झाल्याचे उघडकीस आणले. त्यावरून केंद्रे आणि अंमलदार संदीप जाधव यांनी आदर्श महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा वनिता सुनील पाटील तिचा पती सुनील अंबादास मानकापे, प्रमुख संचालिका सविता देविदास अधाने आणि या सर्वांकडून अपहार करून घेणारा मुख्य आरोपी अंबादास मानकापे या चौघांना अटक केली.


सम्बन्धित सामग्री