Thursday, June 27, 2024 08:24:11 PM

नवीन एका वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती

नवीन एका वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती  

मुंबई, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण मुंबईतील जीटी रुग्णालयाचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग जोरदार तयारी करत आहे. केवळ एकट्या जीटी रुग्णालयाचे महाविद्यालयामध्ये रूपांतर करणे अवघड आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मानांकनाची पूर्तता करण्यासाठी कामा रुग्णालय आणि जीटी रुग्णालयाचे संलग्नीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रक्रियेस वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्यता दिल्याने आता दोन्ही रुग्णालयांचे मिळून वैद्यकीय महाविद्यालय तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


सम्बन्धित सामग्री