Sunday, September 29, 2024 02:26:55 AM

सरकारने मद्यप्रेमींसाठी जर्मनीहून मागवली ८९ यत्रं

सरकारने मद्यप्रेमींसाठी जर्मनीहून मागवली ८९ यत्रं

मुंबई,१९ मार्च २०२४, प्रतिनिधी : राज्यातील 'मद्यप्रेमीं'ना रेस्टॉरंट आणि बारामध्ये दर्जेदार मद्य मिळावे, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने परदेशातून 'अँटनपार' नावाचे ८९ अत्याधुनिक यंत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातही प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला असून त्याला राज्य सरकारनेही मंजुरी दिली. अशा पद्धतीचे यंत्र घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असणार आहेत.

मद्य निर्मिती आणि विक्रीतून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र राज्यातील परमीट रूम, हॉटेल, क्लब आणि बारमध्ये सर्रास मद्यात भेसळ सुरु असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे भेसळयुक्त मद्य मिळत असल्याचा तक्रारी दिवसेंदिवस वाढत जात आहे. याला आळा घालण्यासाठी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगीरी उंचावण्यासाठी जर्मन बनावटीचे अँनटपार मशीन घेण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला होता.


सम्बन्धित सामग्री