Sunday, July 07, 2024 12:54:19 AM

अफूच्या शेतीवर पोलिसांचे छापे

अफूच्या शेतीवर पोलिसांचे छापे

पुणे,१९ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. निसर्गाने नटलेल्या, डोंगर दरीत तसेच नदी नाले असलेल्या या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती केली जात आहे. अशातच जिल्ह्यात खसखसच्या नावाखाली अफूची शेती केली जातं असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून १ फेब्रुवारीपासून ते आत्तापर्यंत ८ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. कांदा, लसूण तसेच इतर पिकांमध्ये अफूची लागवड केल्याचे समोर आले आहे. दौंड या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. त्यात ४१६ किलो अफू जप्त करण्यात आलं आहे. अर्धा एकर जागेत अफूची शेती केली जात होती. आतापर्यंत ज्या आठ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. त्यात घोडेगाव, शिक्रापूर, सासवड, जेजुरी, भिगवन, यवत आणि हवेली अशा ठिकाणी अफूची शेती केली जातं होती. त्या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत तिथे ७५१ किलो अफू जप्त करण्यात आलं आहे.

अफूची शेती बेकायदेशीर असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन आहे की अफूची शेती करू नये. काही शेतकरी हे खसखसच्या नावाखाली अफूची शेती करतात. हे सर्व बेकायदेशीर असून अशा पद्धतीने जर कोणी खसखसच्या नावाखाली अफूची शेती करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. चार पैसे जास्त मिळत आहेत म्हणून कोणीही या गुन्हेगारी शेतीकडे वळू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणलं होतं. पुणे पोलिसांना ड्रग्स प्रकरण उघडकीस आणलं आहे. शेतीच्या आड हा गोरख धंदा करण्यात येत असून लसून, कांदा अशा शेतीसाठी त्याची लागवड होत आहे. यावर पोलिसांची करडी नजर असून जो कोणी बेकायदेशीर काम करेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

              

सम्बन्धित सामग्री