Tuesday, July 02, 2024 08:37:38 AM

आयोध्येसाठी बस यात्रा सुरू होणार

आयोध्येसाठी बस यात्रा सुरू होणार

पुणे, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी :  जानेवारीत महिन्यात अयोध्येत प्रभू रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला. यानंतर प्रभू रामाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची संख्या वाढत आहे. रेल्वेने विशेषतः स्पेशल आस्था रेल्वे सुरू केली आहे. त्याचं धरतीवर एसटी महामंडळाने पुढाकार घेतला असून  अयोध्येला जाण्यासाठी सरासरी ४५ ते ५५ जणांच्या भाविकांचा ग्रुप असेल तर एक बस सोडण्यात येणार आहे. यामुळे भाविकाना प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेता येणार आहे.राज्यात धुळे जिल्ह्यातून पहिली बस दर्शनासाठी सोडण्यात आली होती. त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यातून मागणीनुसार बसेस सोडल्या जातील. जर भाविकांचा ५० जणांचा ग्रुप असेल तसेच त्यांच्या मागणीनुसार आणि सोयीनुसार पाहिजे ती गाडी देण्यात येणार आहे.

अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी जाणार्‍या भाविकांसाठी प्रतिकिलोमीटर ५६ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. त्यासाठी  ५० भाविकांनी एकत्र येऊन ग्रूप तयार करावा लागेल. या प्रवासासाठी चांगल्या गाड्या देण्यात येतील. तसेच सोबत दोन चालक असतील. या यात्रेदरम्यान तीन-चार मुक्काम होतील. आरामदायी प्रवासासाठी शिवशाही तर ज्यांना स्वस्तात प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी मागणीप्रमाणे साधी लालपरी बसही देण्यात येईल.

                 

सम्बन्धित सामग्री