Sunday, July 07, 2024 12:46:45 AM

'या' राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख बदलली

या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख बदलली

नवी दिल्ली, दि. १७ मार्च, २०२४ - अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ आणि कालावधी २ जून रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशासह या दोन राज्यांतील मतमोजणी ४ जूनला होणार होती, मात्र आता अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांतील मतमोजणी २ जूनला होणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने या दोन राज्यांसह चार राज्यांमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची घोषणा केली आहे.


सम्बन्धित सामग्री