Thursday, July 04, 2024 10:21:35 AM

उद्धव यांची वसमतमध्ये संवाद सभा

उद्धव यांची वसमतमध्ये संवाद सभा

हिंगोली, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे सोमवारपासून दोन दिवसीय हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे सोमवार आणि मंगळवार अश्या दोन दिवसात चार सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांची सोमवारी पहिली सभा वसमत या ठिकाणी आयोजित करण्यात आली असून, सकाळी अकरा वाजता कृष्णा गार्डन मंगल कार्यालय इथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो आहे.

आघाडीमध्ये हिंगोलीची जागा शिवसेनेकडे राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा जोर लावला जातो आहे. कारण हिंगोली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अनेकवेळा हिंगोलीने शिवसेनेला खासदार दिला, त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा हिंगोलीकर शिवसेनेचा खासदार निवडून आणतील अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच उद्धव ठाकरेंनी पहिला दौरा हिंगोली जिल्ह्याचा करण्याचं ठरवले आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्यामध्ये हिंगोली लोकसभेचा उमेदवार ठाकरे घोषित करतात का ? हे पहावे लागणार आहे.

उद्धव ठाकरे यांचा दौरा (१८ मार्च २०२४

  • सकाळी 9.30 वाजता मुंबईहून विमानाने नांदेड येथे आगमन 
  • सकाळी 11 वाजता वसमत येथे संवाद मेळावा  
  • दुपारी 2 वाजता जेवणासाठी वेळ राखीव 
  • दुपारी 3 वाजता सेनगाव येथे संवाद मेळावा 
  • सायंकाळी 6 वाजता कळमनुरी येथे संवाद मेळावा 
  • सायंकाळी 7 वाजता कळमनुरीहून हिंगोलीकडे प्रयाण 
  • रात्री 8 वाजता हिंगोलीमध्ये मुक्काम 

सम्बन्धित सामग्री