Friday, July 05, 2024 03:48:39 AM

पाणीटंचाईच्या भीषण झळा

पाणीटंचाईच्या भीषण झळा

छत्रपती संभाजीनगर, १८ मार्च २०२३, प्रतिनिधी: उन्हाळ्याची चाहूल लागताच छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरी आणि मध्यम प्रकल्पांची पाणी पातळीही खालावली आहे. यामुळे तालुक्यातील २५ गावांत ५७ टँकरने (११५ खेपा) पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय विविध गावांतील ६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.सिल्लोड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे अनेक छोटे, मोठे प्रकल्प भरले नाहीत. जलपुनर्भरणही न होऊ शकल्याने विहिरींनीही सध्या तळ गाठला आहे. यामुळे तालुक्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा सुरु झाल्या आहेत.


सम्बन्धित सामग्री